Pune MPSC Protest Pudhari
पुणे

Pune MPSC Protest: पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन, धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की परीक्षा...

Dhananjay Munde Pune Student Protest: मला मुख्यमंत्री यांनी फोनवर शब्द दिला की परीक्षा आॕब्जेक्टिव होणार, असे आश्वासन मुंडेंनी विद्यार्थ्यांना दिले.

पुढारी डिजिटल टीम

Pune MPSC Student Protest News

पुणे : पुण्यात शुक्रवारी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलक विद्यार्थ्यांची संध्याकाळी धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. 'मला मुख्यमंत्री यांनी फोनवर शब्द दिला की परीक्षा आॕब्जेक्टिव होणार', असे आश्वासन मुंडेंनी विद्यार्थ्यांना दिले.

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांनी शुक्रवारीही आंदोलन केले. या आंदोलनात काही विद्यार्थी शास्त्री रस्त्यावर तर काही विद्यार्थी एस एम जोशी गरवारे पुलावर बसले आहेत. एमपीएसीची परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह व्हायला हवी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. संध्याकाळी शास्त्री रस्त्यावर अहिल्या शिक्षण मंडळाच्या समोर विद्यार्थ्यांची गर्दी वाढली होती.

शास्त्री रस्त्यावरील आंदोलनस्थळी धनंजय मुंडेंनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘सोमवार किंवा मंगळवारी विद्यार्थ्यांनी मुंबईला यावं. मी सर्व प्रश्न मंजूर करून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो', असे मुंडेंनी सांगितले. मला मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालायला सांगितले असून त्यांच्यासोबत बैठकही होणार आहे. मला मुख्यमंत्री यांनी फोनवर शब्द दिला की परीक्षा आॕब्जेक्टिव होणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एमपीएससी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पुण्यात गुरुवारपासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवर यांना बडतर्फ करावे आणि सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT