RailTel server down Pune Pudhari
पुणे

RailTel server down Pune: रेलटेलचा सर्व्हर डाऊन; खनिकर्म विभागाचे कामकाज ठप्प

ऐन दिवाळीत नागरिकांना हेलपाटे; कंपनीचे कर्मचारी सुट्टीवर असल्याचे समोर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शासकीय कार्यालयांमधील ऑनलाइन कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या रेलटेल कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सर्व्हर बंद पडल्याने पुण्यातील खनिकर्म विभागाचे कामकाज ठप्प झाले. ऐन दिवाळीच्या सणासुदीत ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विविध कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

विशेष म्हणजे, सर्व्हरमधील बिघाड दूर करण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीचे कर्मचारीच सुट्टीवर असल्याचे वास्तव समोर आल्याने शासकीय सेवांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शासकीय कार्यालयांमधील अनेक सेवा आता ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात. विविध दाखले, प्रमाणपत्रे, अर्जांची नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रियांसाठी संबंधित सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

मात्र, रेलटेल कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या प्रणालीवर अवलंबून असलेले कामकाज प्रभावित झाले. पुण्यातील खनिकर्म विभागातही या बिघाडाचा फटका बसला. कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रणालीवर काम करता येत नसल्याने कार्यालयीन प्रक्रिया रखडल्या.

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी आपली प्रलंबित शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी कार्यालयात धाव घेतली होती. मात्र, कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्व्हर बंद असल्याचे समजल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागले.

काही नागरिकांना कामासाठी पुन्हा कार्यालयात येण्याची वेळ आली. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय झाला. विशेष म्हणजे, तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी रेलटेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रश्न निर्माण झाला.

मात्र, कंपनीचे कर्मचारी दिवाळीच्या सुट्टीवर असल्याचे समोर आले. शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरू असताना त्यांना सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून तांत्रिक मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्याचा फटका बसला.

ऑखो देखा हाल...

रेलटेलचा सर्व्हर डाऊन – तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाइन प्रणाली बंद.

खनिकर्म विभागाचे कामकाज ठप्प – पुण्यातील विभागातील नियमित प्रशासकीय कामांवर परिणाम.

ऐन दिवाळीत नागरिकांची गैरसोय – दाखले, प्रमाणपत्रे आणि अन्य कामांसाठी आलेल्या नागरिकांना हेलपाटे.

कंपनीचे कर्मचारी सुट्टीवर – सर्व्हर दुरुस्तीसाठी तातडीने तांत्रिक मदत उपलब्ध नसल्याचे समोर.

प्रशासकीय कामे रखडली – ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी आणि पुढील प्रक्रिया प्रभावित.

नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया – पुन्हा कार्यालयात येण्याची वेळ.

पर्यायी व्यवस्था नाही – सर्व्हर बंद पडल्यास कामकाज सुरू ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणेचा अभाव.

ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्याचा शासनाचा प्रयत्न असताना, एका सर्व्हरच्या बिघाडामुळे संपूर्ण विभागाचे काम ठप्प होणे ही बाब गंभीर आहे. अशा तांत्रिक अडचणींच्या काळात पर्यायी व्यवस्था आणि आपत्कालीन तांत्रिक मदत उपलब्ध ठेवण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.
- रोहन सुरवसे पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT