Pune Metro Water Leakage Pudhari
पुणे

Pune Metro Water Leakage Video: पुणे मेट्रो डब्यात पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल

पावसामुळे नाही तर एसी ड्रेनेज ब्लॉकेजमुळे तांत्रिक बिघाड; महामेट्रोने दिले स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुण्यात झालेल्या पावसानंतर सोशल मीडियावर पुणे मेट्रोचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये धावत्या मेट्रोच्या डब्यात (कोच) छतातून पाणीगळती होत असल्याचे दिसत आहे. मेट्रोच्या कामाच्या दर्जावर नागरिकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महामेट्रो प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिली आहे. याबाबत महामेट्रोचे अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर म्हणाले, प्रवाशांनी चित्रीत केलेल्या या व्हिडीओमध्ये वनाज ते रामवाडी मार्गावरील धावत्या मेट्रोच्या एका डब्यात छतामधून पाण्याच्या धारा लागल्याचे पाहायला मिळाले.

ही गळती पावसाचे पाणी थेट आत शिरल्यामुळे झालेली नाही. गुरुवार 21 मे रोजी ‌’ट्रेन सेट‌’मधील एका डब्याच्या वातानुकूलन यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता. एसी यंत्रणेतील पाण्याचा निचरा करणारी ड्रेन पाइप ब्लॉक झाल्यामुळे एसीचे पाणी गोळा होऊन ते डब्यात गळू लागले.

याचा पावसाच्या पाण्याशी थेट संबंध नाही. हा प्रकार निदर्शनास येताच संबंधित ट्रेन ऑपरेटरने तातडीने नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सुरक्षेचा उपाय म्हणून तत्काळ ते एसी युनिट बंद करण्यात आले आणि साचलेले पाणी साफ करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

यानंतर संबंधित डब्याची दुरुस्ती करून तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे. यामुळे मेट्रोच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही तांबवेकर यांनी या वेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT