Metro  Pudhari
पुणे

Pune Metro Water Leakage: घरमालकाने बोअरवेलसाठी खड्डा खणला; पुणे मेट्रो बोगद्याला सहा इंचाचं भगदाड पडलं, गुन्हा दाखल

unauthorised borewell drilling pune: निष्काळजीपणामुळे मेट्रो मार्गिकेला धोका; खडक पोलिसांकडून कारवाई, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

pune metro tunnel breach borewell drilling case

पुणे: घराच्या जागेखालून भूमिगत मेट्रो गेलेली माहीत असताना देखील बोअरवेल घेतल्याने, बोगद्याच्या मास्कला खड्डा पडून मेट्रो मार्गिकेवर पाणीगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पुणे मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक (सिव्हिल) शंतनु गोरात्रा यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 मार्च रोजी दुपारी पावणेएक वाजताच्या सुमारास खडक पोलिस ठाण्यासमोर शुक्रवार पेठ घर क्रमांक 415 येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे यांना आपल्या घराच्या जागेच्या खालून भूमिगत मेट्रो गेली आहे हे माहिती आहे.

मात्र, तरी देखील त्यांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणाने बोअरवेलचे काम केले. त्यामुळे भूमिगत बोगद्याच्या मास्कला सहा इंचाचा खड्डा पडला. खड्ड्यामुळे मेट्रो मार्गिकेवर पाणीगळती झाली. मोटे यांनी लोकांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षितेस धोका निर्माण होणारे कृत्य केले.

तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त निधी प्रकल्पातून महामेट्रोच्या मालमत्तेचे मूल्य किंवा उपयुक्तता नष्ट होईल किंवा कमी होईल अशा प्रकारचे कृत्य करून, मेट्रोच्या मालमत्तेचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, बोअरवेलमुळे मेट्रोमार्गिकेत पाणीगळती झाल्याचे निदर्शनास येताच मेट्रोच्या वतीने खडक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT