Hinjewadi Shivajinagar Metro Pudhari
पुणे

Pune Metro Last Train Timetable: हिंजवडीकरांसाठी गुड न्यूज! पुणे मेट्रोच्या शेवटच्या फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर

रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना दिलासा; जिल्हा न्यायालय ते माण आणि माण ते जिल्हा न्यायालय मार्गावरील स्थानकनिहाय वेळा जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजनबद्ध व्हावा, यासाठी पुणेरी मेट्रो प्रशासनाने पिंक लाइनवरील जिल्हा न्यायालय ते माण मेट्रोस्थानक यादरम्यानच्या (हिंजवडी-शिवाजीनगर) शेवटच्या मेट्रो गाड्यांचे स्थानकनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे आयटी पार्क परिसरात काम करणारे कर्मचारी आणि रात्री उशिरा हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांंना आपल्या प्रवासाचे अचूक नियोजन करणे शक्य होणार असून, प्रवासाची चिंता मिटणार आहे.

जिल्हा न्यायालय ते माण मार्गिका :

  • जिल्हा न्यायालय व कृषी महाविद्यालय - रात्री ११:४० वा.

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सकाळनगर व औंध - रात्री ११:४५ वा.

  • बालेवाडी फाटा - रात्री ११:५० वा.

  • बालेवाडी हाय स्ट्रीट, आर. के. लक्ष्मण म्युझियम व मिटकॉन बालेवाडी - रात्री ११:५५ वा.

  • श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे) व वाकड चौक - मध्यरात्री १२ वा.

  • हिंजवडी फेज १, छत्रपती शिवाजी महाराज चौक (हिंजवडी) व पद्मभूषण चौक: मध्यरात्री १२:०५ वा.

  • हिंजवडी फेज २ (सर्कल १ व सर्कल २) - मध्यरात्री १२:१० वा.

  • माण बस डेपो व माण - एमआयडीसी सर्कल (फेज २) - मध्यरात्री १२:१५ वा.

  • माण (अंतिम स्थानक) - मध्यरात्री १२:२० वा.

माण ते जिल्हा न्यायालय मार्गिका :

  • माण, माण- एमआयडीसी सर्कल (फेज २) व माण बस डेपो - रात्री १०:३० वा.

  • हिंजवडी फेज २ (सर्कल २ व १) व पद्मभूषण चौक - रात्री १०:३५ वा.

  • छत्रपती शिवाजी महाराज चौक (हिंजवडी) व हिंजवडी फेज १ - रात्री १०:४० वा.

  • वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे) व मिटकॉन बालेवाडी - रात्री १०:४५ वा.

  • आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी हाय स्ट्रीट व बालेवाडी फाटा - रात्री १०:५० वा.

  • औंध - रात्री १०:५५ वा.

  • सकाळनगर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - रात्री ११ वा.

  • कृषी महाविद्यालय - रात्री ११:०५ वा.

  • जिल्हा न्यायालय (अंतिम स्थानक) - रात्री ११:१० वा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT