पुणे

Pune Maratha Reservation : साबळेवाडीत उपोषण, नेत्यांना गावबंदी!

अमृता चौगुले

शेलपिंपळगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण तसेच नेत्याना गाव बंदी करण्यात येत आहे. जिल्ह्यतील साबळेवाडी (ता.खेड, जि. पुणे) येथे मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी पाच दिवसीय उपोषण तसेच नेत्यांना गाव बंदी करून राजकारण्यांवरील रोष व्यक्त केला आहे.

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. राज्यभरही मराठा समाजबांधवांचे उपोषण सुरू आहे. याच मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुण्यात लाक्षणिक उपोषण आणि नेत्यांना गाव बंदी केली जात आहे.

SCROLL FOR NEXT