पुणे : पुणे महापालिकेसाठी भारतीय प्रशासन सेवेतील राहुल रंजन महिवाल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून आणि अरुण आनंदकर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. भारतीय संविधानाच्या अपेक्षेप्रमाणे उपरोक्त निवडणूक निर्भयमुक्त व पारदर्शक होण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणे सर्व दक्षता व काळजी घेण्यासाठी तसेच या निवडणूक प्रक्रियेवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने भारतीय प्रशासकीय सेवेतील (भाप्रसे) देखरेख ठेवण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक यांच्या नेमणुका केल्या आहेत.
पुणे महापालिकेसाठी भाप्रसेमधील राहुल रंजन महिवाल यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून आणि अरुण आनंदकर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. तसेच, निवडणूक कामकाजासाठी त्यांची कार्यालयीन बैठकव्यवस्था करण्यात आली आहे.
निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने त्यांची भेटण्याची वेळ दुपारी ४ ते ६ (उपलब्धतेनुसार) अशी राहणार आहे. तसेच, पत्रव्यवहारासाठी महापालिकेच्या नवीन इमारतीत पहिल्या मजल्यावरील कक्षात करता येणार आहे.