पुणे

Pune LPG News : पुण्यात घरगुती गॅस दिला व्यावसायिक वापरासाठी, दुकानदाराला अटक; १०३ गॅस सिलिंडर जप्त

पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : घरगुती गॅसचा अवैध पद्धतीने साठा करून काळाबाजार करणाऱ्या दुकानावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल १०३ गॅस सिलिंडर जप्त करून पोलिसांनी नितीन हनुमंत होळकर (वय ३८, रा. हांडेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. होळकर याच्याकडे गॅस साठवणूक करण्याचा कोणताही परवाना नसताना त्याने या गॅस सिलिंडरच्या टाक्यांचा साठा केला होता.

काळेपडळ पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना हांडेवाडी परिसरात एक दुकानदार घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस ट्रान्स्फर करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. त्या वेळी घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी तसेच काळाबाजारासाठी साठा करून ठेवण्यात समोर आले.

या वेळी पोलिसांनी तेथून १०३ गॅस सिलिंडर टाक्या, चारचाकी गाड्या आणि इतर साहित्य असा 10 लाख 9 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत आरोपीकडे गॅस साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक अमित शेटे, अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर यांच्यासह पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT