पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ अथवा फिरते खंडपीठ पुणे शहराला मिळावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील वकीलांचा आक्रमक पवित्रा अद्यापही कायम आहे. शनिवारी (दि. 13) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतही वकील कामकाजात सहभागी झाले नाहीत.
सलग दुसऱ्या लोकअदालतीवरही वकीलवर्गाचा बहिष्कार कायम असल्याने न्यायालयीन कामकाजात काहीसा विस्कळीतपणा आल्याचे दिसून आले. वकील वर्गाकडून वारंवार मागणी होऊनही त्यास प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे, वकील वर्गाची बहिष्काराची भूमिका कायम आहे.
न्यायालयीन कामकाज विस्कळीत व्हावे, अशी आमची कदापी इच्छा नाही. मात्र, वकीलवर्गाच्या मागण्यांची प्रशासनाने विचार करण्याची वेळ आहे, असे पुणे बार असोसिएशचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड यांनी स्पष्ट केले.