पिंपरखेड (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी दुपारी बिबट्याने रोहन विलास बोंबे या 13 वर्षांच्या मुलावर हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने वनविभागाचे वाहन पेटविले.
रोहन बोंबे हा घराबाहेर मोकळ्या जागेत खेळत होता. यावेळी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेले. मुलगा दिसत नसल्याचे त्यांच्या आजीने आई-वडिलांना सांगितले. त्यांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला. तरुणांना उसाच्या शेतात रोहन मृतावस्थेत दिसला.