Pune News | खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड! चासकमानचे पाणी आवर्तन पुढील ४ ते ५ दिवसांत सुटणार 
पुणे

Pune News | खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड! चासकमानचे पाणी आवर्तन पुढील ४ ते ५ दिवसांत सुटणार

पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या नियोजनासाठी बैठक

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील चासकमान आणि भामा आसखेड धरणाच्या पाणी आवर्तनाचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून येत्या चार ते पाच दिवसांत चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात आवर्तन सोडण्यात येणार आहे. तसेच दोन्ही धरणातून भीमा व भामा नदीवरील बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.

त्यातील भामा आसखेड धरणाच्या खालील बंधारे भरून घ्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. या आवर्तन आणि नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना दिवाळी गोड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या सन २०२६-२७ च्या नियोजनासंदर्भात विधान भवन, विभागीय आयुक्त कार्यालय येथे जलसंपदा विभागाच्या सनियंत्रण समिती व कालवा सल्लागार समितीची बैठक गुरुवारी (दि २९) पार पडली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खेड तालुक्यातील पाणीप्रश्ना बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी आवर्तन सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या ४ ते ५ दिवसांत प्रत्यक्ष पाणी सोडण्यात येणार आहे.तसेच भामा आसखेड खालील पत्रात बंधारे भरण्यासाठी यापूर्वीच पाणी सोडण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. चारा पिके, पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळावा, त्यांच्या शेतात पाणी पोहोचावे आणि त्यांच्या कष्टाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि खेड तालुक्याच्या हितासाठी मी नेहमीच ठामपणे उभा राहीन.
- बाबाजी काळे, आमदार खेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT