अत्याचार करून चिमुकलीची हत्या! pudhari photo
पुणे

Pune Crime : नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या!

जुन्‍नर तालुक्यातील घटना; आरोपीला बेड्या ठोकून ‘पोक्सों’तर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नसरापूर येथे बालिकेवर अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच, साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या संतापजनक घटनेने पिंपळवंडी (ता. जुन्‍नर) परिसर हादरला. यातील आरोपीला बेड्या ठोकून त्याच्यावर ‘पोक्सों’तर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी १० वाजता संतप्त ग्रामस्थांनी पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी स्‍टँड येथे रास्ता रोको आंदोलन केले. ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे’ आदी घोषणा देत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मंगळवारी पिंपळवंडी गावठाण परिसरात ही धक्कादायक घटना घडली. घरात पीडित मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत २५ वर्षीय तरुणाने तिला उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT