Firing at Saswad
सासवड येथे गोळीबारामध्ये आईस्क्रीम विक्रेता गंभीररित्या जखमी झाला.  Pudhari News Network
पुणे

Pune Firing News | पुणे : सासवड येथे गोळीबारात आईस्क्रीम विक्रेता गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गोळीबारामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला. या संदर्भात स्थानिक व प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानकासमोर आज (दि.१८) दुपारी ३.५० च्या दरम्यान ही घटना घडली. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यात ४१ वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT