पुणे : घरकाम करणाऱ्या महिलांनी ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना सॅलिसबरी पार्क भागात घडली. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका डॉक्टर महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६१ वर्षीय डॉक्टर महिला कोंढव्यातील उंड्री भागात राहायला आहेत. त्यांची आई सॅलिसबरी पार्क भागातील गिडनी पार्क येथे राहायला आहे.
त्यांच्या आईच्या घरात तीन महिला कामाला होत्या. त्यांच्या आईचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील १९ लाख ८० हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. घरकाम करणाऱ्या महिलांनी दागिने चोरल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास आहेत.