Rainfall in Pune district
पुणे ः अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होताच पुणे शहरासह पिंपरी चिंचवड अन संपूर्ण जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत तुफानी पावसाने दाणादाण उडवून दिली. सर्वाधिक पाऊस लवळे येथे 48.7 ,शिवाजीनगर 18.7 तर जिल्ह्यात भोर येथे 14.5 मी.मी पावसाची नोंद झाली.
यंदा आठ ते दहा दिवस आधीच मंगळवारी (दि.13 मे) अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला.त्यामुळे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.विजांच्या कडकडाटासह पावसाने सुमारे एक तास एकाचे वेगाने पाऊस पडत होता.त्यामुळे रस्त्यांना पूर आला.सकाळीच कार्यालयाकडे निघालेल्या लोकांसह पथारी विक्रेत्यांची बाजारात एकच धावपळ झाली.तासभरात शहर जलमय झाले.सलख भागात पाणी शिरले.त्यामुळे काही भागात अग्नीशम दलाला कॉल गेले.मात्र फार मोठी झाडपडी किंवा नुकसान या पावसाने झाले नाही.
हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार शहरासह सूंर्ण जिल्ह्यात 19 मे पर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी रेनकोट जवळ ठेवावा.मुसळधार पावसात विजांचा कडकडाट सुरु असताना झाडाखाली,मोकळ्या मैदानात उभे राहू नका,मोबाईलवर बोलू नका असे आवाहन हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे.
नारायणगाव 54,लवळे 48.7,हडपसर 22.5,शिवाजीनगर 18.7, पाषाण 17.1,कात्रज 23.8, खडकवासला 10.8, दौड 15, राजगुरुनगर 11, भोर 14.5, डुडुळगाव 14.5, माळीन 6, एनडीए 6, कुरवंडे 3.5,चिंचवड 0.5,लोहगाव 0.2, कोरेगावपार्क 2,वडगावशेरी 1.5