Pune Weather Pudhari
पुणे

Pune Weather: ढगाळ वातावरणामुळे तापमान घटले; उकाडा कायम, तापमान 44 वरून 41 अंशांवर

ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी प्रचंड उकडा जाणवत होता.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील लोहगावचा पारा मंगळवारी 44 अंशांवर होता. त्यात गुरुवारी मोठी घट झाली असून, कमाल तापमान 37 ते 41 अंशांवर खाली आले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे गुरुवारी प्रचंड उकडा जाणवत होता.

पुणेकरांना यंदाचाही उन्हाळा असह्य होत आहे. कमाल तापमानात घट होत असली तरी ढगाळ वातावरण तयार झाल्याने गुरुवारी प्रचंड उकाडा जाणवत होता.‌‘ काय हा उकाडा...घर किंवा कार्यालयाबाहेर पडायची हिंम्मत होत नाही असे संवाद गुरुवारी देखील मिळाले !‌‘

दरम्यान, शहरात आगामी 48 तासांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. शहरात 16 मेपर्यंत उकाडा राहील त्यानंतर 17 ते 20 मेदरम्यान हलका पाऊस पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT