पुणे: शहरात उष्णतेची लाट दोन दिवसांपासून सक्रिय झाली आहे. रविवारी लोहगावचा पारा 41 अंशांवर गेल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. भरदुपारी प्रमुख रस्त्यांवरची वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले.
शहरातील बहुतांश भागाचे तापमान
39 ते 40 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत उष्ण लहरी सक्रिय झाल्याने पुणेकरांचा रविवार कुलरसमोरच गेला. सायंकाळी देखील खूप उकाडा जाणवत असल्याने नागरिक घराबाहेर पडले. उद्यानात गर्दी झालेली दिसत होती. रविवारचे शहराचे तापमान : शिवाजीनगर 39, पाषाण 38, लोहगाव 41, चिंचवड 39, लवळे 39, मगरपट्टा 39, एनडीए 38, कोरेगाव पार्क 39.