Mango Pudhari
पुणे

Pune Hapus Mango Price: पुण्यात हापूस आंबा महागच; अक्षय्य तृतीयेलाही दर कमी नाहीत

आवक वाढूनही 800 ते 1500 रुपये डझन दर कायम; ग्राहक खरेदीत सावध भूमिका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची गुलटेकडी मार्केट यार्डात आवक वाढू लागली आहे. मात्र दर अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे झालेले नाहीत. उलट, यंदा अक्षय्य तृतीयेलाही आंबा महागच राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात 800 ते 1500 रुपये डझन या दराने आंबा उपलब्ध आहे.

दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात आंब्याची मोठी आवक होऊन दर खाली येतात. मात्र, यंदा लहरी हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन अपेक्षित आवक होताना दिसत नाही. त्यामुळे, घाऊकसह किरकोळ बाजारात आंब्याचे दर चढेच आहेत. कोकणपट्‌‍ट्यातून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात दररोज जवळपास दहा हजार पेट्या, तर कर्नाटकातून दोन ते अडीच हजार पेट्यांमधून आंबा दाखल होत आहे.

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आवक वाढली आहे. रविवारपर्यंत आंबा तयार होईल. मात्र, सध्याचे दर खूपच जास्त आहेत. त्यामुळे, आंबा खरेदी करताना ग््रााहक हात आखडता घेत आहे. एरवी एका पेटीची खरेदी करणारे नागरिक एक ते दोन डझन खरेदी करीत आहे. अक्षय्य तृतीयेनंतर आंब्याचे दर खाली येण्याची शक्यता आहे.
युवराज काची, हापूस आंब्याचे व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT