हडपसरवरून चालवणार विशेष रेल्वेसेवा file photo
पुणे

Special Festival Train Pune: हडपसरवरून चालवणार विशेष रेल्वेसेवा

ही विशेष ट्रेन मागणीनुसार विशेष दरासह चालवली जाईल.

पुढारी वृत्तसेवा

Pune Special Festival Train Service

पुणे: रेल्वेच्या पुणे विभागामार्फत अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहे. दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ या सणांच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पुणे विभागामार्फत वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि हडपसर यादरम्यान विशेष रेल्वेसेवा चालविण्यात येणार आहे. ही विशेष ट्रेन मागणीनुसार विशेष दरासह चालवली जाईल.

ट्रेन क्र. 01924 दर शनिवारी वीरांगना लक्ष्मीबाई झाशी येथून सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार वाजून 30 मिनिटांनी हडपसर (पुणे) येथे पोहचेल. ही सेवा 27 सप्टेंबर 2025 ते 29 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालेल.  (Latest Pune News)

या गाडीच्या 10 फेऱ्या होतील. ट्रेन क्र. 01923 दर रविवारी हडपसर (पुणे) येथून सायंकाळी सात वाजून 10 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता वीरांगना लक्ष्मीबाई झाशी येथे पोहचेल. ही सेवा 28 सप्टेंबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत धावेल.

या गाडीच्या 10 फेऱ्या होतील. या ट्रेनमध्ये 17 कोच असतील, यात एक एसी 2-टियर, तीन एसी 3-टियर, सात स्लीपर क्लास, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन लगेज कम गार्ड बेक व्हॅन असतील. दरम्यान, बीना, रानी कमलापती, इटारसी, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाइन या स्थानकांवर थांबा घेईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT