पुणे : युद्धजन्य स्थिती मुळे पुणे(हडपसर)- जोधपूर एक्स्प्रेस रद्द कारण्यात आली आहे तर पुणे- जम्मू तावी झेलम एक्सप्रेस शोर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
गाडी क्र. 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस दिनांक 10.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस दिनांक 11.05.2025 रोजी सुरू होणारी सेवा रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 11077 पुणे – जम्मू तवी एक्सप्रेस दिनांक 09.05.2025, 10.05.2025, व 11.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथे समाप्त केल्या जातील।
गाडी क्र. 11078 जम्मू तवी – पुणे एक्सप्रेस दिनांक 11.05.2025, 12.05.2025 व 13.05.2025 या सेवा नवी दिल्ली (NDLS) येथून सुरू होतील.
प्रवाशांना विनंती आहे की प्रवास सुरू करण्यापूर्वी 139, प्रवासी माहिती प्रणाली किंवा www.enquiry.indianrail.gov.in यावर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी. स्थानकांवर नियमित घोषणाही करण्यात येत आहेत. असेही रेल्वेने सांगितले.