Assault  Pudhari
पुणे

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार: आजोबावर अल्पवयीन नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप

न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: चिमुकल्या नातीला खोलीत बोलावून तिला निर्वस्त्र करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजोबास न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (दि. 8) पोलिस कोठडी सुनावली. आरोपीला बुधवारी (ता. 6) संध्याकाळी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती न्यायालयास दिली.

सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील अरुंधती बह्मे म्हणाल्या की, आरोपीची बलात्काराच्या गुन्ह्याच्या संबंधाने वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. त्याने अशा प्रकारचे कृत्य इतर कोणासोबत पूर्वी केले आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे.

आरोपीने यापूर्वी मुलीशी असे कृत्य केले आहे का? याबाबत देखील तपास करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. बह्मे यांनी केला.

न्यायालयाने सरकार पक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जनता वसाहत परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी पर्वती पोलिसांत गुन्हा दाखल केला.

शेजारच्या महिलेने अफवा पसरवली: आरोपीचा बचाव

आरोपी आजोबाला न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने विचारले की, तुला कोणत्या कारणासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे याची माहिती आहे का? त्यावर आरोपीने, ‌‘मी नातीसोबत बसलो असता शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली,‌’ असे उत्तर दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT