LPG Cylinder Pudhari
पुणे

Pune Gas Cylinder Supply: पुण्यात गॅसपुरवठा पूर्वपदावर; 83 हजार सिलिंडरचे वितरण

बुकिंगला प्राधान्य; पुढील काही दिवसांत वेटिंग ग्राहकांना दिलासा मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या गॅस टंचाईनंतर आता घरगुती गॅसपुरवठा पूर्वपदावर येत आहे. शनिवारी दिवसभरात 72 हजार बुकिंग, तर 83 हजार सिलिंडरचे वितरण केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सामान्यांना सिलिंडरचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी यापूर्वी बुकिंग केलेल्या ग््रााहकांनाच प्राधान्य द्यावे, अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाने गॅस एजन्सींना दिल्या आहेत. त्यामुळे ज्या एजन्सीधारकांकडे अधिक बुकिंग आहे, त्यांना प्राधान्याने सिलिंडरचे वितरण करण्यात येत आहे. वेटिंगवरील ग््रााहकांना प्राधान्याने सिलिंडर देण्यासाठी संबंधित एजन्सींना अधिकचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत पुढील तीन ते चार दिवसांत सामान्य होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात शनिवारी 70 हजार 859 गॅस सिलिंडरचे बुकिंग करण्यात आले होते. तर कंपन्यांकडून 90 हजार 001 सिलिंडरचे एजन्सींना वितरण करण्यात आले. तसेच एजन्सींकडून प्रत्यक्ष ग््रााहकांना 83 हजार 440 सिलिंडरचे वितरण झाले.

त्यामुळे मागणीपेक्षा सुमारे 13 हजार अधिक सिलिंडर देण्यात आले आहेत. यात जुन्या बुकिंगचाही समावेश आहे. पुढील तीन ते चार दिवसांत वेटिंगवरील सर्व ग््रााहकांना सिलिंडरचे वितरण करण्यात येईल व त्यानंतर मागणीनुसार संपूर्ण पुरवठा त्या त्या दिवशी सुरळीत होईल, अशी माहिती जिल्हापुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली.

दरम्यान, काही एजन्सीधारकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या 96 तासांच्या आत वितरणाच्या अटीबाबत नाराजी व्यक्त केली. या कालावधीत सिलिंडर पुरवणे अवघड असल्याचे या एजन्सीधारकांचे म्हणणे आहे. मात्र, घरपोच वितरणाची व्यवस्था असलेल्या एजन्सीधारकांना या स्वरुपाची अडचण आलेली नाही. त्यामुळे वितरणाची व्यवस्था नसलेल्या एजन्सींनी ती तातडीने करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे सुधळकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT