पुण्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले. मुख्य विसर्जन मार्गावरील बेलबाग चौकातून दुपारी ४:०० वाजता दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी मुठा नदीपात्रातील पांचाळेश्वर घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
Dagadusheth Halwai Ganapati : पुण्यातील भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य मिरवणूक अलका चौकातून मार्गस्थ होत आहे. भव्य आकर्षक नक्षीकाम व फुलांची विशेष सजावट केलेल्या 'श्री वक्रतुंड' रथात बाप्पा विराजमान झाले असून या रथाचे सारथ्य पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांनी केले आहे.
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला केसरीवाडा गणपती अशा पाचही मानाच्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला कसबा गणपतीच्या मिरवणुकीने सुरूवात झाली. महात्मा फुले मंडईतून सकाळी 9.40 ला कसबा गणपतीची मिरवणूक निघाली. 10.28 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात आली. त्यानंतर सायंकाळी 4.40 मिनिटांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरूवात झाली. सकाळी 11.25 ला हा गणपती बेलबाग चौकात आला. 7 तास 15 मिनिटे मिरवणूक चालल्यानंतर सायंकाळी 5 वाजता तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करून निरोप देण्यात आला.
गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सकाळी 10.15 वाजता मंडईतून निघाली. ही मिरवणूक 7 तास 20 मिनिटे चालली. त्यानंतर 5.05 मिनिटांनी गणरायाला विसर्जन करून निरोप देण्यात आला.
पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपतीची मिरवणुकीला सकाळी 10.45 वाजता सुरूवात झाली. दुपारी 1.54 वाजता बेलबाग चौकात पोहोचल्यानंतर सायंकाळी 5.34 वाजता बाप्पाचे विसर्जन झाले.
पारंपरिक लवाजमा, ढोल-ताशांच्या गजरात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी सव्वा आकरा वाजता सुरूवात झाली. मंडईतून ही मिरवणूक दुपारी 3 वाजता बेलबाग चौकात पोहचली. त्यानंतर सायंकाळी 6.15 वाजता बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे सायंकाळी ५:०० वाजता पारंपरिक जल्लोषात आणि भावूक वातावरणात विसर्जन करण्यात आले. या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक तब्बल सव्वा सात तास चालली.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. तब्बल ६ तास ५५ मिनिटे चाललेल्या या मिरवणुकीनंतर सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
कसबा गणपती सकाळी ९:४५ वाजता मंडईत दाखल झाला, तर १०:२८ वाजता बेलबाग चौकात पोहोचला. त्यानंतर विविध मार्गांवरून मिरवणूक पुढे सरकत अखेर सायंकाळी ४:४० वाजता विसर्जन पार पडले.
पुण्याच्या गणेशोत्सवातील मानाच्या पहिल्या गणपतीच्या या मिरवणुकीला विशेष महत्त्व असून, मोठ्या संख्येने भाविकांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम अलका चौकात दाखल झाला आहे. गणरायाच्या आगमनावेळी गणेशभक्तांकडून गुलालाची उधळण करण्यात येत असून, परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांकडून बाप्पाचा जयघोष करण्यात येत आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो सेवा तब्बल ४१ तास सलग सुरू राहणार आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणारी मेट्रो सेवा २६ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे मध्यवर्ती पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने भाविक आणि प्रवाशांना पर्यायी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने भाविक शहराच्या मध्यवर्ती भागात दाखल होतात. मिरवणुकीदरम्यान प्रमुख रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
ही परिस्थिती लक्षात घेऊन पुणे मेट्रोची सेवा नियमित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबरच्या सकाळपासून २६ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध राहणार असल्याने प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे.
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान बेलबाग चौकात दाखल झाला आहे. यावेळी मिरवणुकीत मोठी गर्दी असतानाही एका रुग्णवाहिकेला मार्ग करून देण्यासाठी गणेशभक्तांनी बाजूला होत सहकार्य केले. गर्दीतून ॲम्बुलन्सला वाट करून देत भाविकांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू असून, गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कसबा गणपती लक्ष्मी रोडवरून अल्का चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे, तर तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात पोहोचला आहे. इतर मानाचे गणपतीही मिरवणुकीत पुढे सरकत आहेत.
कसबा गणपती : लक्ष्मी रोडवरून अल्का चौकाकडे मार्गस्थ.
तांबडी जोगेश्वरी : बेलबाग चौकात दाखल.
गुरुजी तालीम : बेलबाग चौकाच्या अलीकडे.
तुळशीबाग गणपती : मंडईतून बेलबाग चौकाच्या दिशेने मार्गस्थ.
केसरीवाडा गणपती : मंडई चौकात दाखल.
मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीमुळे पुण्यातील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, भाविक मोठ्या भक्तिभावाने बाप्पाला निरोप देत आहेत.
पुण्यातील ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मंडई परिसरातून मार्गस्थ होत असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी १० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली असून, मानाच्या गणपतींच्या मंडईतील आगमन आणि पुढील मार्गावरील हालचालींकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवातील मानाच्या गणपतींना विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतींचा सहभाग हा पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. यंदाही गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक
दिलेल्या माहितीनुसार, मानाच्या गणपतींच्या मंडई परिसरातील आगमनाच्या वेळा आणि बेलबाग चौकातील अपेक्षित वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
कसबा गणपती
मंडईत आगमन सकाळी ९:४५
तांबडी जोगेश्वरी
मंडईत आगमन सकाळी १०:००
गुरुजी तालीम
मंडईत आगमन सकाळी १०:१५
तुळशीबाग गणपती
मंडईत आगमन सकाळी १०:४५
केसरीवाडा गणपती
मंडईत आगमन सकाळी ११:१०
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असताना, त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले असून, गरज पडल्यास भाविकांना तातडीने उपचार व प्रथमोपचार मिळावेत, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यातील मानाच्या तसेच प्रमुख गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. या सोहळ्यासाठी शहराच्या विविध भागांतून गणेशभक्त दाखल होत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली असून, मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. तसेच मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडईत दाखल झाला आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचा चौथा गणपती म्हणून तुळशीबाग गणपतीला विशेष महत्त्व आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळशीबाग गणपती मंडईच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. गणरायाच्या मिरवणुकीमुळे भाविकांमध्ये उत्साह असून, बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी जमू लागली आहे.
तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला पुण्याच्या पारंपरिक गणेशोत्सवात महत्त्वाचे स्थान आहे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत धार्मिक विधी, पारंपरिक वाद्ये आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडईत दाखल झाला आहे. पुण्याच्या मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या आगमनामुळे विसर्जन मिरवणुकीतील उत्साह आणखी वाढला आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपतीला पुण्याच्या धार्मिक परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीच्या मिरवणुकीकडेही भाविकांचे लक्ष लागलेले असते. मंडई परिसरात मानाच्या गणपतींचे आगमन होत असताना गणेशभक्तांकडून जयघोष आणि भक्तिभावाने बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी टिळक पुतळा या ठिकाणी पोहोचला आहे. गणरायाच्या आगमनानंतर आता काही वेळातच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशभक्तांचे लक्ष मिरवणुकीच्या पुढील टप्प्याकडे लागले आहे.
पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचा पहिला गणपती म्हणून श्री कसबा गणपतीला विशेष महत्त्व आहे. विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गणराय टिळक पुतळा या ठिकाणी पोहोचला आहे. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे.
कसबा गणपतीच्या मिरवणुकीला पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सव परंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी या सोहळ्याकडे गणेशभक्त आणि पुणेकरांचे लक्ष असते.
पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून सजावट करण्यात आली आहे. महात्मा फुले मंडई ते लक्ष्मी रोड या विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याची तयारी करण्यात आली आहे.
या रांगोळीच्या माध्यमातून खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात जनजागृती करण्यात आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहासोबतच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जन मार्गावरील ही रांगोळी पुणेकरांचे आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे पूजन करून आशीर्वाद घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून, या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गणेशभक्ती आणि धार्मिक वातावरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी गणरायाचे दर्शन घेतले.
पुणे : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे. गणरायाची आरती संपन्न झाली असून, आता बाप्पा पालखीत विराजमान होणार आहेत. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणपतीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यामुळे पुण्यातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कसबा गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील अत्यंत महत्त्वाचा मानाचा गणपती मानला जातो. विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या गणपतीला विशेष स्थान असून, या सोहळ्याला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.
दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्यातील गणेशोत्सवातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीला विशेष महत्त्व आहे. या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजर आहेत.
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रोड हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.
ढोल-ताशा पथके, पारंपरिक वाद्ये आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
Pune Ganpati Visarjan 2026 LIVE Updates: पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोड, मंडई परिसर आणि मध्यवर्ती पुण्यातील मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीसह मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीतील महत्त्वाचे क्षण, ढोल-ताशांचा गजर, भक्तांची गर्दी आणि विसर्जनाशी संबंधित ताज्या घडामोडींचे LIVE अपडेट्स येथे जाणून घ्या.