Pune Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav: गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेझर बंदीला पाठिंबा; साउंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनची भूमिका

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी प्लाझ्मा, प्रेशर मीड आणि लेझरच्या बंदीला साउंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनने पाठिंबा दिला.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सार्वजनिक गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर मिड आणि लेझरच्या वापरावर पोलिसांनी बंदी घातल्यास साउंड ॲण्ड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन पूर्ण पाठिंबा देईल, असे असोसिएशनचे अध्यक्ष बबलू रमझानी, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, खजिनदार मेहबूब खान व कार्याध्यक्ष राजू कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सामान्य साउंड सिस्टिमचा आवाज ८० डेसिबल असतो. मात्र, प्लाझ्मा व प्रेशरमुळे तो ११० डेसिबलहून अधिक वाढून नागरिकांना व वृद्धांना त्रास होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून, पुणे शहरातील २ हजार व्यावसायिक व २० हजार कुटुंबांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून असल्याचा विचार प्रशासनाने करावा.

डीजे, प्लाझ्मा व लेझरचा वापर टाळून सण शांततेत व आनंदाने साजरे करण्याचे आवाहन रमझानी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT