Fruits Pudhari
पुणे

Pune Fruit Market Rates: दिवाळीच्या सुट्ट्यांचा फळबाजाराला फटका! कलिंगड, पपई, पेरूसह अनेक फळे १० टक्क्यांनी स्वस्त

पुण्यात फळांची मागणी घटली; आवक कमी पडल्याने डाळिंबाचे भाव मात्र वधारले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बहुतांश नागरिक गावी गेल्याने आणि शहरात असलेल्या नागरिकांचा कल फराळाकडे वाढल्याने फळांच्या मागणीत घट झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या फळांच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने कलिंगड, पपई, खरबूज, लिंबू, ड्रॅगन फ्रूट आणि पेरूच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. दुसरीकडे, आवक कमी पडल्याने डाळिंबाचे भाव मात्र वधारले आहेत. उर्वरित अन्य सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळबाजारात रविवारी (दि. ८) लिंबू सातशे ते नऊशे गोणी, मोसंबी ४० ते ५० टन, संत्रा २५ ते ३० टन, डाळींब ३० ते ३५ टन, पपई ९ ते १० टेम्पो, कलिंगड ७ ते ८ गाड्या, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिक्कू १ हजार डाग, पेरु दीड ते दोन हजार क्रेट, सिताफळ १० ते १२ टन, ड्रॅगन १२ ते १३ टन, सफरचंद ४ ते ५ हजार पेटी आणि अननसाची ६ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबू (प्रतिगोणी) : ३०० ते १६००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५० (४ डझन) : ५०-६०, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-३००, आरक्ता : १०-६०, गणेश : ५-४०, कलिंगड : ८-१२, खरबूज : १५-३०, पपई : १२-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : २००-५००, अननस (१ डझन) : ३००-९००, सीताफळ (१ किलो) : २०-१२०, ड्रॅगन (एक किलो ) ५०-८०, सफरचंद : कश्मीर डेलिशियस (१५ ते १६ किलो) १२००-१८००, किन्नोर (२० ते २५ किलो) ४०००-४५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT