Pomegranate Pudhari
पुणे

Pune Fruit Market Pomegranate Price: पुणे फळबाजारात डाळिंबाला ‘लाल’ झळाळी; मागणी वाढल्याने दरात १० टक्क्यांची वाढ

पावसामुळे डाळिंबाच्या प्रतवारीत सुधारणा; पपई आणि खरबुजाचे दरही किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले, फळांची आवक वाढली

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मॉन्सून सक्रिय होऊन झालेल्या पावसामुळे डाळिंबाच्या प्रतवारीत सुधारणा झाली आहे. परिणामी, बाजारात लालसर दाण्यांचे डाळींब दाखल होऊ लागले आहेत. डाळींबाच्या हंगामास अवकाश असला तरी हंगामपुर्व डाळींबाची चांगली आवक होत असून त्याला मागणीही आहे. परिणामी, डाळींबाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

पावसानंतर वातावरणात गारठा कायम असल्याने पपईला मागणी कायम आहे. याखेरीज, खरबूजालाही चांगली मागणी आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने त्यांच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

पालख्यांना निरोप दिल्यानंतर राज्यासह परराज्यातून फळांची आवक वाढली आहे. डाळींब, खरबूज आणि पपई वगळता उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम राहिल्याने त्यांचे भाव कायम असल्याचे सांगण्यात आले.

फळबाजारात रविवारी (दि. १२) लिंबू १ हजार ते १ हजार २०० गोणी, मोसंबी १0 ते १५ टन, संत्रा १ टन, डाळींब 3५ ते ४० टन, पपई २० ते २५ टेम्पो, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू १५ ते २० टन, पेरु १० ते १५ टन आणि अननसाची ४ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे:

लिंबे (प्रतिगोणी) : २०० ते ५००, मोसंबी : (३ डझन) : २१०-3५० (४ डझन) : ४५-१८०, संत्रा : (१० किलो) : २००-७००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-30, कलिंगड : १५-१८, खरबूज : २५-४०, पपई : १८-२७, चिक्कू (दहा किलो) : 3००-८००, पेरु (२० किलो) : २००-४००, अननस (१ डझन) : १००-६००, आंबा : बदाम (एक किलो) २0 ते ३0, तोतापुरी २० ते २५, निलम २० ते 30. प्लम (२ किलो) : ४५०-५५०, पीच (७ ते ८ किलो) : ८००-१०००, चेरी (१ किलो) : ४००-५००, जांभूळ (१ किलो) : ६० ते १००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT