पुणे: लग्नसराई संपल्याने शोभिवंत फुलांच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरवली आहे. याखेरीज सणासुदीचा काळ नसल्याने सुट्या फुलांच्या मागणीतही घट झाली आहे.
थंडीमुळे फुलांच्या उत्पादनावर परिणाम होऊ लागल्याने कमी प्रमाणात फुले बाजारात दाखल होत आहेत. आवक-जावक कायम असल्याने गत आठवड्यातील फुलांचे दर टिकून असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे:
झेंडू : 10-30, गुलछडी : 80-120, ॲष्टर : जुडी 10-16, सुट्टा 50-80, कापरी : 10-30, शेवंती : 30-70, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : 20-30, गुलछडी काडी : 50-80, डच गुलाब (20 नग) : 100-180, जर्बेरा : 30-50, कार्नेशियन : 130-160, शेवंती काडी 150-250, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-120, जिप्सोफिला : 100-300, लीली बंडल : 10-15.