Fish  Pudhari
पुणे

Pune Fish Market Rates: पुण्यात मासळीचे दर तेजीत; पापलेट 2400 तर लॉबस्टर 2200 रुपये किलो

आवक घटल्याने समुद्री मासळी महागली; मटण, चिकन आणि अंड्यांचे दर मात्र स्थिर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पूर्व किनारपट्टीवर मासेमारी पूर्णपणे बंद असून, पश्चिम किनारपट्टीवरील गुजरात ते केरळम येथून मासळीची आवक सुरू आहे. नेहमीपेक्षा आवक कमी असल्याने सर्व प्रकारच्या मासळीचे भाव तेजीत आहेत.

मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने मटण, चिकन आणि अंड्यांचे दर मागील आठवड्याप्रमाणे स्थिर आहेत. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (दि. 17) खोल समुद्रातील 10 ते 12 टन, खाडी 150 ते 200 किलो आणि नदीच्या मासळीची 700 ते 800 किलो इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर):

पापलेट : कापरी : 2200-2400, मोठे : 1800-2000, मध्यम : 1500-1600, लहान : 1100-1200, भिला : 900-1000, हलवा : 900-1000, सुरमई 1000-1400, रावस : 900-1000, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी (सोललेली) : 450-500, भिंग : 450-500, पाला : 1000-1400, वाम : पिवळी 1000-1200, काळी : 500-600, ओले बोंबील : 300-400.

कोळंबी : लहान : 250-300, मध्यम : 350-450, मोठी : 550-650, जम्बो प्रॉन्स : 1500-1600, किंग प्रॉन्स : 800-900, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-450, मांदेली : 140-180, राणीमासा : 250-300, खेकडे : 300-400, चिंबोऱ्या : 700-1000. खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 400-500, तांबोशी : 550-600, पालू : 250-300, लेपा : 300-400, बांगडा : 250-300, शेवटे : 300-350, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250.

नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 180-240, मरळ : 350-450, शिवडा : 250-300, खवली : 250-300, आम्ळी : 140-200, खेकडे : 250-400, चिलापी : 80-180, वाम : 550-650. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 240, लेगपीस 290, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 340. अंडी : गावरान (शेकडा) 1100 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 575, डझन 78, प्रतिनग 6.50.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT