पुणे: देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीहून गणेश पेठ येथील मासळी बाजारात मासळी दाखल होत आहे. बाजारात मासळीची आवक मुबलक आहे. मात्र, परिक्षांचा कालावधी सुरू असल्याने मासळीच्या मागणीतील घट जैसे थे आहे. आवक जावक कायम असल्याने बाजारात मासळीचे गत आठवड्यातील तेजीतील दर टिकून आहेत.
उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कोंबड्याच्या वाढीवर झाला आहे. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत दर्जेदार पक्ष्यांची उपलब्धता कमी प्रमाणात होत असल्याने चिकनच्या भावात किलोमागे वीस रुपयांची वाढ झाली आहे. तर वाढलेल्या उष्णतेमुळे गावरानसह इंग्लिश अंडीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी, गावरान अंडी शेकड्यामागे 100 ते 125 रुपये तर इंग्लिश अंडी 40 ते 50 रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले. मटणाचे दर स्थिर राहिले आहेत. रविवारी बाजारात (दि. 8) खोल समुद्रातील मासळी 10 ते 15 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 200 ते 250 किलो आणि नदीच्या मासळीची 500 ते 700 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 20 ते 25 टन इतकी आवक झाली होती.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) -
पापलेट : कापरी : 1800-2000, मोठे : 1500-1800, मध्यम : 1300-1500, लहान : 1100-1300, भिला : 900-1000, हलवा : 700-850, सुरमई 900-1200, रावस : 800-120, घोळ : 900-1000, करली : 350-400, करंदी : 450-500, भिंग : 400-500, पाला : 1000-1200, वाम : पिवळी 600-1200, काळी : 400-450, ओले बोंबील : 350-480.
कोळंबी : लहान : 300-400, मोठी : 450-500, जम्बो प्रॉन्स : 1500, किंग प्रॉन्स : 800, लॉबस्टर : 2000-2200, मोरी : 350-400, मांदेली : 100-140, राणीमासा : 240-300, खेकडे : 320-400, चिंबोऱ्या : 650-750.
खाडीची मासळी - सौंदाळे : 250-300, खापी : 250-300, नगली : 550-600, तांबोशी : 550-600, पालू : 250-300, लेपा : 350-400, बांगडा : 200-300, शेवटे : 300-350, पेडवी : 150-200, बेळुंजी : 150-200, तिसऱ्या : 250-300, खुबे : 150-200, तारली : 200-250.
नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 180-250, मरळ : 350-400, शिवडा : 200-250, खवली : 200-250, आम्ळी : 150-160, खेकडे : 250-400, चिलापी : 60-160, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 800, बोलाईचे 800, खिमा 800, कलेजी 840. चिकन 260, लेगपीस 300, जिवंत कोंबडी 180, बोनलेस 350. अंडी : गावरान (शेकडा) 1120 डझन 140, प्रतिनग 12. इंग्लिश (शेकडा) 465, डझन 66, प्रतिनग 5.50.