पुणे

पुणे : विश्वकोश होणार ऑनलाइन उपलब्ध

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताचा अभिमान आणि जागतिक आश्चर्य असणारा असा विश्वकोश काही काळातच ऑनलाइनही उपलब्ध होणार असल्याची माहिती कोशाचे अध्यक्ष डॉ. भव शर्मा यांनी दिली. डेक्कनमधील 'ओपन डे' कार्यक्रमात संपादन कक्षामध्ये कोशनिर्मितीमधील विविध टप्पे, ग्रंथालय, शब्दार्थ संपादनाची माहिती देताना ते बोलत होते. या वेळी सहभागी लोकांना संपादन कक्षसुद्धा पाहता आला.

आतापर्यंत प्रकाशित झालेल्या विश्वकोशाचे 35 खंड, तसेच संस्कृत आणि कोशशास्त्र विभागाने प्रकाशित केलेली विविध पुस्तके खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या समन्वयक संहिता जोशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्य करणार्‍यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT