रवींद्र धंगेकर, कॉंग्रेस आमदार File Photo
पुणे

Pune Drugs Case | मंत्रीच अधिकार्‍यांना पाठीशी घालतात: रवींद्र धंगेकर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यामध्ये रविवारी एका हॉटेलमध्ये ड्रग घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोर्शे कार अपघातप्रकरणी धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता रविवारच्या घटनेवर देखील धंगेकर यांनी कडक भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली आहे.

… तरूणाईला बरबाद करण्याचं काम

धंगेकर म्हणाले, आम्ही एवढं मोठं आंदोलन करूनसुद्धा संबंधित अधिकार्‍याची बदलीसुद्धा झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, शंभूराज देसाई या अधिकार्‍यांना पाठीशी घालतात. हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करतात. मी तुम्हाला यादी देऊ शकतो की, कुठल्या हॉटेमधून किती पैसे जातात, माझ्याकडे यादी आहे. यादीत प्रचंड प्रमाणातील पैसे हप्त्याच्या स्वरूपात पोलिसांना मिळतात.

निव्वळ पैसे, हप्ता याच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरून या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. येणार्‍या अधिवेशनात या विषयावर आम्ही बोलणार.
रवींद्र धंगेकर, आमदार
पुणे शहराची ओळख आता उडता पंजाब अशी होऊ लागली आहे, याला सर्वस्वी राज्य सरकारचे गृह खाते जबाबदार आहे.
अंकुश काकडे, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असतानाचे व्हिडीओ पुढे आला असून, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोलणे झाले असून, ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला त्या पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना आणि जबाबदार घटकांना तातडीने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय संबंधित हॅाटेलचे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. सदरील प्रकार आणि त्यामुळे आपल्या पुण्याची होणारी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही.
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT