Development Work Pudhari
पुणे

Pune DP Roads Delay: पुण्यात डीपी रस्त्यांची रखडलेली कामे; वाहतूक कोंडीवरून सभागृहात संताप

अपूर्ण रस्ते, अतिक्रमण आणि नियोजनशून्य कारभारावर नगरसेवक आक्रमक; प्रशासनाला जाब

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांची वर्षानुवर्षे रखडलेली कामे आणि त्यातून निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी यावरून महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (दि. 18) अक्षरशः संतापाचा उद्रेक झाला. अपूर्ण रस्ते, अतिक्रमण, जमीन अधिग््राहणातील दिरंगाई आणि नियोजनशून्य कारभारामुळे पुणेकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, ‌’शहराचा श्वास गुदमरला आहे,‌’ अशा तीव शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला.

महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या सभेत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला विकास आराखड्यातील रस्त्यांवरून नगरसेवक आक्रमक झाले. राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट)चे गटनेते काका चव्हाण यांनी धायरीतील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता दरम्यानच्या डीपी रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने पाहणी करूनही प्रत्यक्षात कामे सुरू नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चुकीच्या डिमार्केशनमुळे बांधकामांना परवानगी देण्यात आली का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच नऱ्हे-धायरी परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटविण्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील 12 मीटर सेवारस्त्याचा मुद्दा मांडला. 1997 पासून महापालिकेत समाविष्ट झालेल्या या भागात आजतागायत रस्ता विकसित न झाल्याने वाहतूक कोंडी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. रस्त्यांची सुविधा नसताना मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांना परवानगी देण्यावर त्यांनी टीका केली. चांदणी चौक ते पाषाणदरम्यानच्या 36 मीटर डीपी रस्त्याचे काम रखडल्याची बाब नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी मांडली. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही जमीन ताब्यात घेण्यात अपयश येत असल्याचे त्यांनी सांगितले. पुनित जोशी यांनी शिवणे-खराडी रस्त्यावरील 8 पान 3 वर

अखेर दिली बोलण्याची संधी

विकास आराखड्यातील प्रश्नावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनेक नगरसेवक बोलण्यासाठी हात वर करत होते. यावेळी अमोल बालवडकर यांनी देखील बोलण्यासाठी महापौरांना चिठ्ठी दिली. मात्र, त्यांना बोलण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सभागृहात खाली बसून धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी विरोधी पक्षनेते नीलेश निकम व सभागृह नेते गणेश बिडकर यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर महापौरांनी बालवडकर यांना बोलण्यास परवानगी दिली.

रखडलेले प्रमुख डीपी रस्ते

  • धायरीतील सावित्री गार्डन ते सिंहगड रस्ता

  • चांदणी चौक ते पाषाण 36 मीटर सेवा रस्ता

  • शिवणे-खराडी रस्ता (मिसिंग लिंक)

  • वारजे तिरुपतीनगर ते रोझवाडी रस्ता

  • हडपसर 24 मीटर डीपी रस्ता

  • केशवनगरमधील 36 मीटर रस्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT