पुणे

पुणे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी चव्हाण

अमृता चौगुले

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी आर. एन. चव्हाण यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आयुष प्रसाद यांनी कार्यकाळात प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणली. शिक्षकांची बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्याचबरोबर 100 दिवसांत विकासकामांचा निधी संपवण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे मुलींसाठी निवासी शाळा उभारण्यात आली. जिल्ह्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल केली. आयुष प्रसाद यांची जळगावला बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी महसूल व वन विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT