Maharashtra Assembly Polls  file photo
पुणे

Maharashtra Assembly Poll : पुणे जिल्ह्यात 757 पैकी 109 अर्ज अवैध

तब्बल 648 अर्ज ठरले वैध; 4 नोव्हेंबरला चित्र होणार स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व 21 मतदारसंघांत दाखल करण्यात आलेल्या 757 अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. यात 648 अर्ज वैध, तर 109 अर्ज फेटाळण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांतून 551 उमेदवारांनी 757 अर्ज जिल्हा निवडणूक शाखेकडे दाखल केले होते. बुधवारी या सर्व अर्जांची छाननी झाली. यात 109 अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

येत्या 4 नोव्हेंबर रोजी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. यानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. 21 मतदारसंघांतील 1 हजार 272 उमेदवारांनी 2 हजार 506 अर्ज खरेदी केले आहेत. त्यांपैकी प्रत्यक्षात दाखल केलेल्या अर्जांची संख्या खूपच कमी आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT