Demolition Pudhari
पुणे

Pune Demolition Rules: पुण्यात इमारत पाडकामासाठी नवे कडक नियम; महापालिकेची नियमावली जाहीर

सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी पूर्वपरवानगी व NOC अनिवार्य

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात वाढत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर जुन्या इमारतींच्या पाडकामासाठी आता कडक नियम लागू करण्यात आले. पाडकामाची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रथमच सविस्तर नियमावली जाहीर केली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या नव्या नियमांची घोषणा केली. त्यानुसार, कोणतीही इमारत पाडण्यापूर्वी संबंधित विभागांची पूर्वपरवानगी घेणे तसेच आवश्यक माहिती प्रशासनाला सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित सोसायट्यांनी शेजारील इमारतींचे अध्यक्ष व सचिव यांचे संपर्क क्रमांक, तसेच अग्निशमन दल, पोलिस, महावितरण आणि एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांची माहिती देणे आवश्यक राहणार आहे.

कर संकलन आणि पाणीपुरवठा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. पाडकामामुळे शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्या इमारती पूर्णपणे रिकाम्या करण्याची जबाबदारी विकसक आणि संबंधित सोसायट्यांवर टाकण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT