पुणे: पुणे शहरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवण्यासाठी पीएमपीची पुणे दर्शन सेवा सज्ज झाली असून, उन्हाळी सुट्यांमध्ये या सेवेचा लाभ पुणेकरांसह बाहेरून पुण्यात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फक्त 500 रुपयांत 17 ठिकाणे
शहरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर पर्यटकांना घडविण्यासाठी पीएमपीकडून पुणे दर्शन बससेवा पुरवण्यात येते. पुणे दर्शन बससेवेसाठी प्रतिप्रवासी फक्त 500 रुपये तिकीट आहे. या तिकिटात शहरातील एकूण 17 पर्यटन स्थळे पहाता येतात.
दोन ठिकाणांहून करता येते बुकिंग
पीएमपीच्या डेक्कन जिमखाना बसस्थानक व मोलेदिना बसस्थानक पुणे स्टेशन या दोन ठिकाणांवरून पुणे दर्शन या बससेवेचे तिकीट बुक करता येईल. पुणे दर्शन बस पुणे स्टेशन बसस्थानकावरून सकाळी 8.45 वाजता सुटते व डेक्कन जिमखाना बसस्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटते.
ही पर्यटन स्थळे येणार पाहता
केसरीवाडा, शनिवारवाडा, लालमहाल, श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिर (बाह्य दर्शन), महात्मा फुले वाडा, आगाखान पॅलेस, आदिवासी वस्तू संग्रहालय, युद्ध भूमी/नॅशनल वॉर मेमोरियल सदन कमांड एरिया शिंदे छत्री, शिंदे छत्री, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, सारसबाग गणपती मंदिर, महालक्ष्मी मंदिर (बाह्य दर्शन), पु. ल. देशपांडे, केळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, चतु:श्रुंगी माता मंदिर, एविएशन गॅलरी शिवाजीनगर