Pune Crime News Today
पुणे: देहविक्रीसाठी प्रियकराने महिलेला पाच लाख रुपयाला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विकले. पीडित महिला मूळची आसाम येथील आहे. त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियकर शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम, पापा शेख, अधुरा शिवा कामली आणि डिबीवाला (तपास पथकातील पोलिस ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २५ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
दरम्यान मागील काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीला देखील येथील कुंटणखाण्यात विकण्यात आले होते. तिच्याच मेत्रीनीने तिची विक्री केली होती. मुलीने तेथून पळ काढल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.