Molestation Case Pudhari Photo
पुणे

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून वर्षभर सामूहिक अत्याचार

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांकडून लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सलग एक वर्ष या चौघांकडून तिच्‍यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमांनी तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समजते. अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांत धाव घेतली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांनी फरहान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल या चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही पुण्याच्या विमाननगर परिसरात वास्तव्यास आहे. २०२५ मध्ये या तरुणीने पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. याच ठिकाणी तिची ओळख या प्रकरणातील मुख्य आरोपी फरहान शेख याच्याशी झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, याच विश्वासाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत फरहानने आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप या महाविद्यालयीन तरुणीने केला आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, केवळ एकानेच नव्हे, तर या प्रकरणातील चौघांनी मिळून गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. या खळबळजनक घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून प्रकरणातील चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे. मात्र, शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT