Extortion News Pudhari
पुणे

Pune Crime : पुण्यात मित्रानेच मागितली मैत्रिणीकडे 20 लाखाची खंडणी, फोटो व्हायरल करण्याची धमकी

वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे : मैत्रीमध्ये वाद झाल्यानंतर मित्रानेच आपल्या मैत्रिणीला ब्लॅकमेल करत, 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. एवढेच नाही तर खंडणी दिली नाही तरुणीचे फोटो व्हायरल करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी, वारजे माळवाडी पोलिसांनी विजयसिंह संतोष गुंड (वय 30, रा. मडेवडगाव, ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) याला अटक केली आहे. याबाबत 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 25 डिसेंबर 2025 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.

याबाबत बोलताना वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी सांगितले की, संशयीत आरोपी विजयसिंह संतोष गुंड आणि फिर्यादी तरुणी एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात मैत्री आहे. परंतु, काही कारणातून त्यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे संशयीत आरोपीने तरुणीचा पाठलाग करून तिच्याकडे 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर तरुणीने त्याला पैसे दिले नाही तर त्याच्यासोबत असलेले तरुणीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादी तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध हाताला धरून जवळ ओढले. तसेच गावातील ग्रुपवर तरुणीचे फोटो व्हायरल केले. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन संशयीत आरोपी गुंड याने केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार देताच, गुन्हा दाखल करून वारजे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT