कडूस : तिसऱ्या श्रावणी सोमवारी व चतुर्थीच्या दिवशी कडूस (ता. खेड) येथील तुरुकवाडी येथे सोमवार (दि. ३१) रोजी पहाटे माजी ग्रामपंचायत सदस्याच्या मुलासह १० आरोपींनी २ गोवंशांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवार (दि. १) रोजी कडूस गाव कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
सकाळी १० वाजता श्री भैरवनाथ महाराज मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी बजरंग दल (कडूस-खेड), गोरक्षक विभाग आणि खेड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वीही आषाढी एकादशीच्या दिवशी अशीच कडूस गावातील रहदारीच्या ठिकाणी, भरवस्तीमध्ये गोहत्या झाली होती. तीन वर्षांनंतर पुन्हा कडूस-तुरुकवाडी येथे गोहत्या झाल्याचे उघडकीस आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.