ai generated image 
पुणे

Pune Crime : दुसऱ्या लग्नाची गोष्ट; पुण्याच्या नामांकित महाविद्यालयातील 55 वर्षीय क्रीडा शिक्षिकेची 17 लाखांची फसवणूक

'गिफ्ट' पाठविण्याच्या बहाण्याने पैसे उकळले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सेकंड शॉदी डॉट कॉम या विवाह विषयक संकेत स्थळावरून झालेल्या ओखळीत एका ठगाने शिक्षिकेची 17 लाख 57 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. ठगाने वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने हे पैसे उकळले आहेत.

याप्रकरणी एका 55 वर्षीय क्रीडा शिक्षिकेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साययबर ठगाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि घटना १० फेब्रुवारी ते २६ मार्च दरम्यान घडली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वडगाव बुद्रुक येथील एका नामांकीत महाविद्यालयात क्रीडा शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांचा आरोपी सोबत सेकंड शादी डॉट कॉम या विवाह विषयक संकेतस्थाळावरून परिचय झाला होता. आरोपीने महिलेला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात खेचून विश्वास संपादन केला. तसेच इंग्लंड येथे चारचाकी वाहन घेणार आहे व स्वतःचे रुग्णालय उभारत असल्याचे सांगितले.

फिर्यीदींच्या कुटुंबीयांबद्दल माहिती घेतल्यानंतर वाढदिवसानिमित्त भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या मोबाईलवरून फोन करून कस्टम विभागातून बोलत असल्याची बतावणी करत भेटवस्तूसाठी फी भरावी लागणार असल्याचे सांगितले. या बहाण्याने 17 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, फिर्याद महिला आरोपीच्या प्रलोभनला बळी पडली. तिने तो सांगेल तसे पैसे हवाली केले. परंतू काही कालावधीनतंर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानुसार तिने याबाबत पोलिसात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT