पुणे

Pune CNG Price Hike : पुण्यात CNG, PNG महागले! MNGLकडून मध्यरात्रीपासूनच दरवाढ लागू

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात एमएनजीएलने सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयांची तर पीएनजीच्या दरात ८५ पैशांची वाढ केली आहे. संबंधित दरवाढ सोमवारी मध्यरात्रीपासूनच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे शहर (पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव व हिंजवडी या लगतच्या परिसरासह) येथील वाहन क्षेत्रासाठीच्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थत सीएनजीच्या किरकोळ दरात प्रति किलो १ रुपयांची (करांसह) वाढ केली आहे. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासूनच सीएनजीची किरकोळ विक्री किंमत ९५.७५ रुपये प्रति किलो इतकी करण्यात येणार आहे.

सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे, सीएनजीच्या दरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. दरातील या अल्प वाढीनंतरही, पुणे शहरातील सध्याच्या दरांचा विचार करता, पेट्रोलच्या तुलनेत ४७ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २५ टक्के प्रवासी कारसाठी तसेच रिक्षांसाठी २५ टक्के बचत होत असल्याचा दावा एमएनजीएलच्या वतीने करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, घरगुती पीएनजीच्या दरातही बदल करण्यात आला असून ५०.६५ रुपयेवरून ५१.५० रुपये प्रति एससीएम इतका करण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर कच्च्या तेलांच्या किंमतीमध्ये घट झालेली असताना सीएनजी आणि पीएनजी दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांना मात्र आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT