महापालिकेचे पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व अन्य जलकेंद्र आणि विविध पाण्यांच्या टाक्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी येत्या गुरुवारी (17 ऑक्टोबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच, शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
* पर्वती जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग : शहरातील सर्व पेठा, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, घोरपडे पेठ, दत्तवाडी, रोहन कृतिका व परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, काशेवाडी, क्वॉर्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, लोहियानगर, जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, सहकानगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेकटाऊन, शिवतेजनगर, अप्पर-लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, साईबाबानगर, कोंढवा खुर्दमधील सर्व्हे क्रमांक 42,46, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, कात्रज, धनकवडी.
* वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
* एसएनडीटी जलकेंद्र परिसर : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रोड शिला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास.
* चतुःशृंगी /एस.एन.डी.टी./ वारजे : जलकेंद्र परिसर : बाणेर, पाषाण, बावधन, चांदणी चौक, जनवाडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, रेंजहिल्स, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर.
* चांदणी चौक परिसर जलकेंद्र : पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटेवस्ती, मधुबन सोसायटी, उजवी व डावी भुसारी कॉलनी चढावरील भाग, गणेशनगर, सुरजनगर, सागर कॉलनी, शांतीबन सोसायटी परिसर, लक्ष्मीनगर, परमहंसनगर, सोमेश्वरवाडी, सूस रोड.
* गांधी भवन टाकी परिसर : काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल विव्ह गार्डन सोसायटी, पॉप्युलरनगर, वारजे माळवाडी, महात्मा सोसायटी, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिसर परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क, आरोह, श्रावणधारा सोसायटी, मुंबई-पुणे बायपास रोडच्या दोन्ही बाजू, कर्वेनगर गावठाण.
* लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर परिसर, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, संपूर्ण हडपसर, गोंधळेनगर, बी. टी. कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क.
* भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर.
* नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड आणि परिसर.