पुणे

पुणे शहर जिल्हा उपनिबंधकपदी संजय राऊत, 11 उपनिबंधकांच्या बदल्यांचे शासनाचे आदेश जारी

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  येथील जिल्हा उपनिबंधकपदी (पुणे शहर) मुंबई येथील उपनिबंधक (के-पूर्व विभाग) संजय राऊत यांची तर नांदेडच्या प्रादेशिक साखर उपसंचालकपदी विनापद कार्यरत असलेले विश्वास देशमुख यांच्या बदलीने नियुक्तीचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी शासन बदली आदेशाचा संदर्भ देत सहकारी संस्थांच्या 11 उपनिबंधकांच्या बदलीबाबतच्या सूचना शुक्रवारी (दि.21) जारी केल्या आहेत. कल्याणच्या उपनिबंधक प्रियंका गाडीलकर यांची मुंबई येथे उपनिबंधक – एल वॉर्ड याठिकाणी तर त्यांच्या जागी विनापद कार्यरत असलेले उपनिबंधक विशाल जाधवर यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेथील उपनिबंधक संभाजी निकम यांची मुंबई येथे रिक्त असलेल्या उपनिबंधक के-पूर्व येथे बदली करण्यात आली आहे.

पुण्यातील उपनिबंधकांच्या बदल्यान्वये नियुक्त्या पुढीलप्रमाणे. पुणे शहर-2 च्या उपनिबंधक स्नेहा जोशी यांची पुणे शहर-1 येथील रिक्त असलेल्या उपनिबंधकपदी, तर पुणे शहर -5 च्या उपनिबंधक निलम पिंगळे यांची जोशी यांच्या बदलीने रिक्त जागी बदली झाली आहे. सोलापूर शहरचे उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांची रिक्त असलेल्या पुणे शहर -3 च्या उपनिबंधकपदी बदली झाली आहे. पालघरचे जिल्हा उपनिबंधक डी.एस. हौसारे यांची पुणे शहर – 4 च्या उपनिबंधकपदी धोंडकर यांच्या बदलीने होणार्‍या रिक्त जागी बदली झाली आहे. पुणे शहर उपनिबंधक -4 चे आर.एस. धोंडकर यांची सहकार आयुक्तालयातील डी.एस. सांळुखे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदावर बदलीने नियुक्ती झाली आहे. तर पुणे शहर जिल्हा उपनिबंधक एन.व्ही.आघाव यांची पिंगळे यांच्या बदीलीने रिक्त झालेल्या पुणे शहर – 5 च्या उपनिबंधकपदी बदलीने नियुक्ती झालेली आहे.

गुरुवारी पदभार स्विकारणार
पुणे शहर जिल्हा उपनिबंधकपदी बदलीने नियुक्ती झालेले मुंबई येथील सहकार उपनिबंधक संजय राऊत हे गुरुवारी (दि.27) आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत. त्यांनी यापुर्वी औरंगाबाद येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, नाशिक येथे विभागीय सह निबंधक-दुग्ध, सोलापूर उपनिबंधक, जळगांव जिल्हा उपनिबंधक, पालघर जिल्हा उपनिबंधक, मुंबई उपनिबंधक या विविध पदांवर काम केलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT