पुणे

Pune : पालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांकडून ‘केराची टोपली’

Laxman Dhenge

पुणे : स्वच्छ सर्वेक्षणात शहराला स्थान मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून नवीन वाहने खरेदी करण्यासह दिवसरात्र स्वच्छतेची कामे केली जात असताना बेशिस्त लोकांकडून मात्र महापालिकेच्या या प्रयत्नांचा कचरा केला जात आहे. सिंहगड रस्त्यावर महापालिकेच्या यंत्रणेने स्वच्छता केल्यानंतर पुन्हा कचरा आणून टाकला जात असल्याने स्वच्छतेवर पाणी फेरले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत महापालिकेकडून शहरात स्वच्छतेची कामे केली जात आहेत. नागरी परिसर पहाटे तर सार्वजनिक ठिकाणे व रस्ते रात्रीच्या वेळी स्वच्छ करून पहाटे सहा सात पूर्वी संपूर्ण कचरा उचलून सर्वत्र स्वच्छता केली जाते.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचर्‍याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.   मात्र, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने व क्षेत्रीय कार्यालयांच्या कर्मचार्‍यांनी स्वच्छता केल्यानंतर अनेक बेशिस्त लोकांकडून रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे महापालिकेच्या उद्दीष्ठांवर पाणी फेरले  जात आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथील उड्डाणपुलाखाली रात्री अनेकजण कचरा आणून टाकतात. हा कचरा महापालिकेचे सेवक सकाळी सहा वाजता उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करतात.

मात्र, परिसर स्वच्छ केल्यानंतर आणि महापालिकेची कचरा संकलित करणारी गाडी तेथून गेल्यानंतरही काही मिनिटांनी लोक पुन्हा कचर्‍याच्या पिशव्या आणून टाकतात. त्यामुळे दिवसभर पुलाखाली कचर्‍याचे साम्राज्य असते. याच रस्त्यावर वडगाव येथील कालव्याच्या पुलावर दुचाकी व चाकीमधून कचर्‍याच्या पिशव्या भिरकावल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी नेमकी केव्हा स्वच्छता करावी, असा प्रश्न निर्माण होतो. पुढे गणेश मळा पाणमळा, दांडेकर पुल, राष्ट्र सेवा दलाच्या परिसर तसेच निलायम पुलाच्या आसपासची परिस्थिती अशीच आहे.

स्वच्छ पुणे  शहर प्रत्यक्षात

आणण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. पालिका प्रशासन, नागरिक एकत्र येऊन हा बदल घडवू शकतात. त्यासाठीच कचर्‍याच्या समस्येचा घेतलेला हा आढावा…

  • सिंहगड  रस्त्यावरील चित्र
  • स्वच्छता केल्यानंतरही फेकला जातो कचरा

शिल्लक भाजी रस्त्यावरच

पानमळा ते धायरी फाटा यादरम्यान पु. ल. देशपांडे उद्यान, राजाराम पुल, हिंगणे, आनंदनगर, वडगाव कालवा व धायरी फाटा या परिसरात अनेक भाजी व्यावसायिक रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात. रात्री उशिरा घरी जाताना राहिलेला व खराब झालेला भाजीपाला जागेवरच ठेवून जातात. मात्र, या रस्त्यावर रात्री उशिरा स्वच्छता केली जात असल्याने सकाळी हा भाजीपाला दिसत नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT