Pune Bridge Collapse: जखमी आणि मृतांची नावे समोर; जिल्हा प्रशासनाने दिली अपडेट  (Pudhari Photo)
पुणे

Pune Bridge Collapse: जखमी आणि मृतांची नावे समोर; जिल्हा प्रशासनाने दिली अपडेट

घटनेत ४ जणांचा मृत्‍यू तर ५१ व्यक्‍ती जखमी : जखमींवर विविध रुग्‍णालयांत उपचार सुरु

Namdev Gharal

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या घटनेतील मृतांची व जखमींची नावे समोर आली आहेत. जिल्‍हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहेत. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा 30 वर्ष जुना लोखंडी पूल रविवारी (दि. 15) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. एकाचवेळी इतका मोठा भार या पुला पेलवला नाही, ज्यामुळे तो कोसळला. या भीषण दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला ५१ व्यक्‍ती जखमींवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती समोर आली आहे. दरम्‍यान कोसळलेला पूल क्रेनच्या सहायाने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली.

मृतांची नावे

चंद्रकात साठले, रोहित माने, विहान माने, व एका मृतदेहाची ओळख पटली नाही

दुर्घटनेतील जखमींवर विविध रुग्‍णालयांत उपचार सुरु

या दुर्घटनेत श्रीकांत गरुड, शुमम वाळूंजकर, सुमेर कागवाडे, विजय येनकर, कृष्‍णा गांधी, आर्यन गायसमुद्रे, दिपक विरकर, सिद्धी बोत्रे, ओंकार पेहरे, चंद्रकात चौघुले, सान्वी भाकरे, योगेश भंडारे, संजय घोपे, दिव्या वाघ, बादल सिद्राम, समर्थ सिद्राम, सोलापूरी, शंतनु निगडे, गोपल तीवर, वैशाली उपाध्याय, शिल्पा भंडारे, यास्मिन चौधरी, अशोक भेगडे, सुनिलकुमार, वैभव उपाध्याय, छोटू, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शामिका माने, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शामिका माने, ओम पिराजी बडगिरे, हरोजी मोहन आगलावे, इंदौल तावरे, सुरेश पडवळ, मोनाली सुरेश पडवळ, वेदांती पडवळ, विनीत पडवळ, योगेश पडवळ, रोहण शिंदे, प्रथमेश पलालकर, अभिषेक पाटील, शौकत गौर, तेजस देवराय, प्रथमेश देवरे, सौरभ माने, दीपक कांबळे, ओमकार गिरी, आकाश काकडे, साहिल शेटे, सलोनी उपाध्याय, लतिका गौड हे या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून या सर्वांवर मायमर हॉस्‍पीटल, अथर्व हॉस्‍पिटल, पवना हॉस्‍पिटल, युनिक हॉस्‍पिटल, या रुग्‍णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्‍यान कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चसुद्धा राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT