Pune Road Diversion Pudhari
पुणे

Pune Akshaya Tritiya Traffic Diversion: अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यात वाहतूक बदल; दगडूशेठ मंदिर परिसरात विशेष नियोजन

शिवाजी रोड, लक्ष्मी रोडवर निर्बंध; गर्दी नियंत्रणासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: अक्षय तृतीया आणि आंबा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गर्दी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 19) सकाळी 7 पासून गर्दी ओसरेपर्यंत शिवाजी रोड, लक्ष्मी रोड आणि आसपासच्या भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपी बस, चारचाकी, तसेच जड वाहनांची वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर बंदी घालण्यात येणार असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक बदल

  • शिवाजी रोडवरून स्वारगेटकडे जाणारी बस वाहतूक स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडमार्गे वळविण्यात येईल.

  • पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या बस जंगली महाराज रोड-झाशी राणी चौकमार्गे जातील.

  • अप्पा बळवंत चौकातून बुधवार पेठ चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील; वाहतूक बाजीराव रोडमार्गे वळवली जाईल.

  • गणेश रोडकडे जाणाऱ्या काही बस मार्गांतही बदल केले असून, पर्यायी अंतर्गत मार्गांचा वापर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT