सराईताला एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगताना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने पकडले.  Pudhari
पुणे

Pune Crime | फरार सराईताकडून गावठी पिस्तूल काडतुसे जप्त; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा

गुन्हे शाखा युनिट सहाची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

Illegal Pistol Seized Pune

पुणेः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दोन गुन्ह्यांत फरारी असलेल्या सराईताला एक गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे बाळगताना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने पकडले. सुशील तानाजी गायकवाड (वय ३९, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस हवालदार अमित दत्तात्रय कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड याच्याकडून 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये एक गावठी पिस्तूल, चार काडतूसे, दोन मोबाईल आणि एका दुचाकीचा समावेश आहे.

गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, सहायक पोलिस निरीक्षक संतोष कदम यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती थेऊर येथील कांबळेवस्ती म्हसोबा मंदिरामागे एक व्यक्ती दुचाकीवर थांबली असून, त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. तो व्यक्ती पिंपरी व दक्षिण म्हाळुंगे येथील दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे.

त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष कदम, उपनिरीक्षक आशिष जाधव पोलिस हवालदार तानाजी देशमुख, श्रीकांत पांडुळे, अमित कांबळे, बाळासाहेब सकटे, अमित सस्ते, झाकीर पठाण यांच्या गायकवाड याला ताब्यात घेतले.

चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. गायकवाड हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या काही महिन्यापासून फरार होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT