पुणे: मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने औंध येथील मुरकुटे प्लाझा येथे छापा टाकून हाय प्रोफाइलचा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या छाप्यात युनिट चारच्या पथकाने महाराष्ट्रातील चार, गुजारातमधील एक आणि थायलंड देशातील चार महिलांची सुटका केली.
याप्रकरणी स्पा मालक, मॅनेजर, कॅशिअर तसेच मध्यस्थी करणार्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणार्या रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय 26, रा. मुळ बेरबेरी रोड, आसाम) याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहायक निरीक्षक नरेंद्र पाटी, उपनिरीक्षक वैभव मगदुम यांच्या पथकाने ही कारवाई केली.