पुणे: आयुर्वेदीक सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. याप्रकरणी, आयुर्वेदिक सेंटर मालक, मॅनेजर कविता आनंद शिंदे (वय. 38) हिच्या विरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस हवालदार इमानखान नदाफ यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मुकुंदनगर गुलटेकडी येथील दिया आयुर्वेदिक सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. (Latest Pune News)
त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक विशांत चव्हाण कर्मचारी तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, अजय राणे, किशोर भुजबळ, वैशाली खेडेकर यांच्या पथकाने केली.